टीम इंडियाचा युवा संघ उपांत्यपुर्वफेरीत

दुबई – एकीकडे टीम इंडिया परदेशात सपाटून मार खात असताना टीम इंडियाच्या युवा संघाने मात्र परदेशात विजयाची हॅटट्रिक साधली आहे. युवा संघाने पापुआ न्यू गिनीला (पीएनजी) पराभूत करून टीम इंडियाच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाने उपांत्य फेरीत धडक मारली. विजय झोलच्या नेतृत्वाखाली खेळणार्याक भारताने पीएनजीवर २४५ धावांनी मोठा विजय मिळवला. टीम इंडियाने दिलेल्या ३०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणार्यार पीएनजीचा डाव अवघ्या ५६ धावांवर संपुष्टात आला.

टीम इंडियाकडून प्रथम फलंदाजी करताना अंकुश बिन्स (५९) आणि अखिल हेरवाडकर (३७) या सलामीवीर जोडीने ५८ धावांची सलामी दिली. बिन्सने ८३ चेंडूत पाच चौकार आणि एक षटकार लगावत अर्धशतक ठोकले. त्यानंतर आलेल्या कर्णधार विजय झोलने ३७ धावा काढल्या. तो स्थिरावण्यापूर्वी नाओने त्याचा त्रिफळा उडवला. संघाचा भरवशाचा मधल्या फळीतील स्टार फलंदाज संजू सॅमसनने अर्धशतकी खेळी करत संघाची धावसंख्या उंचावली. त्याने ४८ चेंडूंचा सामना करताना ८ चौकार आणि ४ षटकार खेचत ८५ धावा कुटल्या. शतकाकडे वाटचाल करणाºया संजूला काबू मोर्यने अॅ लन जोसेफकरवी झेलबाद केले.

टीम इंडियाचा चायना मॅन कुलदीप यादवने पापुआ न्यू गिनीच्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीवर नाचवले. पीएनजीचा डाव अवघ्या ५६ धावांत संपुष्टात आला. रिलेय हेकुरेने सर्वाधिक २० आणि हिरी हिरीने १३ धावा काढल्या. इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. कुलदीप यादवने ८.२ षटकांत १० धावांत चार गडी बाद केले. मोनू कुमारने सहा षटकांत १३ धावा देत तीन बळी घेतले.

Leave a Comment