इस्लामाबाद खतरनाक शहर

इस्लामाबाद – पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद हे अतिशय खतरनाक आणि असुरक्षित शहर असल्याचा अहवाल गृहमंत्रालयाने दिला असून हा अहवाल नॅशनल असेंब्लीसमोर ठेवला जाणार आहे. इस्लामाबाद शहरात अल कायदा आणि अन्य दहशतवादी संघटनांचे स्लीपर सेल मोठ्या प्रमाणात असल्याने हे शहर धोकादायक असल्याचे गृहमंत्रालयाचे म्हणणे आहे. अल कायदा, तहरिक ए पाकिस्तान, लष्कर ए झांगवी या कुख्यात दहशतवादी संघटनांचे स्लीपर सेल या शहरात आहेत.

पाकिस्तानी तालिबान आणि झांगवी पंजाब मध्ये जादा सक्रीय आहेत तर अल कायदा आणि झांगवी या संघटना सिध प्रांतात सक्रीय आहेत. रावळपिडीत गेल्या महिन्यात झालेल्या आत्मघाती स्फोटानंतर एक आठवड्याच इस्लामाबाद येथेही हाय अॅलर्ट घोषित केला होता.

Leave a Comment