राहुलच्या केंब्रिज पदवीबाबत खुलासा करण्याची मागणी

लंडन – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ब्रिटनच्या केंब्रिज विश्वविद्यालयातून डेव्हलपमेंट स्टडीज विषयात मिळविलेल्या पदवीबाबत खुलासा केला जावा अशी मागणी केंब्रिजमधील प्रोफेसर डॉ.अनील सील यांनी केली आहे. केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये राहुलला प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यांनी मदत केली होती मात्र राहुलने त्यावेळी डा. विंसी या नावाने तेथे प्रवेश घेतला होता.

आगामी लोकसभा निवडणुकांत विरोधी पक्षांनी हा प्रचार मुद्दा बनविला असल्याने त्याचा खुलासा केला जावा अशी सील यांची मागणी आहे. ते म्हणाले की दा विंसी या नावाने राहुल दाखल झाले तेव्हा मी प्रवेशासाठी त्यांची मदत केली पण त्यांना शिकविलेले नाही. सील यांची ओळख राहुल व त्यांचे पिता राजीव यांचे शिक्षक अशी करून दिल्याने त्यांनी आपली बाजू मांडताना हा खुलासा केला आहे.

केंब्रिजचे कुलगुरू प्रो.एलिसन रिचर्ड यांनी राहुल गांधी यांना १९९५ सालात राहुल विंसी या नावाने डेव्हलपमेंट स्टडीज मध्ये एम फिल ही पदवी दिली गेली असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते.

Leave a Comment