युकेकडे भारतीय विद्यार्थ्यांनी फिरविली पाठ

उच्चशिक्षणासाठी परदेशी जाणार्याल भारतीय विद्यार्थ्यांनी यूकेला यंदाही विशेष प्राधान्य दिलेले नाही असे दिसून आले आहे. युकेमध्ये शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत सलग दुसर्‍या वर्षीही घट झाली असल्याचा अहवाल हायर एज्युकेशन स्टॅटीस्टीक एजन्सीने दिला आहे.

२०१२-१३ सालात २२३८५ भारतीय विद्यार्थी यूकेत शिक्षणासाठी गेले होते त्यात यंदा २५ टक्के घट झाली आहे. मात्र चीनी विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून ही संख्या ८३,८०० वर गेली आहे. गेली दहा वर्षे भारतीय विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत होती. दरवर्षी अंदाजे २ लाख भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जातात त्यात अमेरिकेचा वाटा ५० टक्के तर यूकेचा १० टक्के आहे असे समजते.

भारतीय विद्यार्थी संख्या घटण्यामागे नुकतीच लागू करण्यात आलेली पोस्ट स्टडी वर्क व्हिसा पॉलिसी कारणीभूत असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यानुसार भारतीय विदयार्थ्यांना या व्हिसासाठी ३ हजार पौंडांचा बाँड द्यावा लागतो. ही रक्कम खूपच अधिक आहे. शिवाय भारतीय विद्यार्थी केवळ परदेशी पदवीला अलिकडे प्राधान्य देत नाहीत तर शैक्षणिक गुणवत्तेकडेही लक्ष देत आहेत. त्यामुळे जर्मनी, स्वीडन, सिगापूर, हाँगकॉग, जपान मधील टॉप रँकिग विद्यापीठांकडे त्यांचा अधिक कल झुकला आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञांच्या मते वरील देशांतील विद्यापीठे भारतात जोरदार माकर्ेटिग करत आहेतच पण रूपया अवमूल्यनामुळे यूके यूएस मधील शिक्षण खर्च अतोनात वाढला आहे व त्यामुळेही भारतीय विद्यार्थ्यांचा प्राधान्यक्रम बदलताना दिसून येत आहे.

Leave a Comment