टाटा ब्रँड भारतात सर्वाधिक मूल्यवान

भारताचा सर्वाधिक मूल्यवान ब्रँड म्हणून टाटा ब्रँडने यावर्षीही आपले स्थान कायम राखले असून त्यांचे एकूण मूल्य २१.१ अब्ज डॉलर्स इतके नोंदले गेले आहे. ब्रँड ग्लोबल ५०० या नावाने जागतिक पातळीवरील कंपन्याची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. त्यानुसार जगातील सर्वाधिक मूल्यवान ब्रॅड म्हणून यूएसच्या टेक्नॉलॉजिकल कंपनी अॅपलने स्थान मिळविले आहे. अॅपलचे मूल्य आहे १०५ अब्ज डॉलर्स.

जगातील पहिल्या दहा मूल्यवान ब्रॅडमध्ये अॅपलपाठोपाठ सॅमसंग (७९ अब्ज) असून त्यापाठोपाठ गुगल, मायक्रोसॉफ्ट, व्हेरिझॉन, जीई, अेटी अॅन्ड टी, अॅमेझॉन, वॉलमार्ट आणि आयबीएम यांचा समावेश आहे. टाटाने आपले गतवर्षीचे स्थान ३९ वरून यंदा ३४ वर नेले आहे. मात्र या यादीत भारतीय कंपन्यांची संख्या सहा वरून पाचवर आली आहे. त्यात एसबीआय, एअरटेल, रिलायन्स, इंडियन ऑईल, यांचा समावेश आहे. यंदा या यादीत आयटीसीला पहिल्या पाचशे कंपन्यात स्थान मिळालेले नाही.

ब्रँड फायनान्सच्या सर्वेक्षणात जगातील सर्वाधिक पॉवरफुल ब्रँड म्हणून इटालियन मोटर उत्पादक कंपनी फेरारी अव्वल स्थानावर असून तिला ट्रिपल अे प्लस अशी ग्रेड दिली गेली आहे.

Leave a Comment