सॅमसंग कंपनीने भारतीय ग्राहकांच्या गरजा विचारात घेऊन बनविलेली आधुनिक गृहपयोगी उपकरणे आणि मोबाईल्सची रेंज पुढच्या आठवड्यात भारतात सादर करण्याचे ठरविले असून त्याचे सादरीकरण नुकतेच बाली येथे भरलेल्या सॅमसंग फोरम २०१४ मेळ्यात करण्यात आले आहे.

भारतात सादर होणार्या उत्पादनांत स्मार्ट वॉशिग मशीन, ७८ इंची कर्व्हड अल्ट्रा हाय डेफिनेशन टिव्ही, ट्रँगल एअर कंडिशनर, स्मार्ट शोकेस फ्रिज यांचा समावेश असून त्यांच्या किंमती लाँचच्या दिवशीच जाहीर केल्या जाणार आहेत. या सर्व उत्पादनांना १० वर्षे वॉरंटी दिली गेली आहे. याचबरोबर सॅमसंग गॅलॅक्सी नोट ३, निओ हँडसेट ४०,९०० रूपयांत भारतात देणार आहेत. १२ भारतीय भाषांचा समावेश असलेला गॅलॅक्सी ग्रँड निओ १८,४५० रूपयांत, गॅलॅक्सी टॅब तीन निओ १६,४९० रूपयांत, गॅलॅक्सी नोट प्रो ही उत्पादनेही सादर केली जात आहेत.
आय टी सेगमेंटमध्ये यूएचडी मॉनिटर स्मार्ट प्रिटर्स, दोन स्मार्ट कॅमेरे यांचा समावेश आहे. भारतीय बाजार हा आमच्यासाठी मोठा बाजार असल्याचे प.आशियाचे सीईओ बी.डी पार्क यांनी नमूद केले असून यंदाच्या वर्षात सॅमसंग मोबाईल युजर्सची संख्या गतवर्षीच्या ८ कोटींवरून १० कोटींवर नेण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत असेही त्यांनी सांगितले.