दुसरी कसोटी अनिर्णित, न्यूझीलंडने मालिका जिंकली

वेलिंग्टन: टीम इंडिया आणि न्यूझीलंडमधील दुसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. या कसोटीत न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेण्डन मॅक्युलमने त्रिशतक झळकावले, तर जिमी नीशामने नाबाद शतक ठोकले. त्यांच्या फलंदाजीमुळे न्युझिलंडने धावाचा डोंगर रचला होता. शेवटच्या दिवशी विराट कोहलीच्या झुंजार शतकाने टीम इंडियाची लाज राखली. त्यामुळे या सामन्यामधील पराभवाचे संकट टळले असले तरी न्यूझीलंडने दोन सामन्यांची ही मालिका १-० जिंकली आहे.

या कसोटीच्या शेवटच्या दिवशी न्यूझीलंडने दुस-या डावातील आठ बाद ६८० धावांला प्रतयुत्तिर देताना शिखर धवन, मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा स्वस्तात माघारी परतल्याने टीम इंडियाची अवस्था ३ बाद ५४ अशी झाली होती. यावेळी कोहलीच्या झुंजार शतकामुळे वेलिंग्टन कसोटी अखेर अनिर्णीत राहिली. कोहलीने कारकीर्दीतील सहावे कसोटी शतक झळकावले. रोहित शर्माच्या साथीने शतकी भागीदारी रचून वेलिंग्टन कसोटी वाचवण्याच्या दृष्टीने मोलाची भूमिका बजावली.

त्याआधी पाचव्या दिवशी न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेण्डन मॅक्युलमने त्रिशतक झळकावलं, तर जिमी नीशामने नाबाद शतक ठोकले. त्यामुळेच न्यूझीलंडने दुस-या डावात आठ बाद ६८० धावांची मजल मारली. त्यामुळे न्यूझीलंडने टीम इंडियाला ६७ षटकांत विजयासाठी ४३५ धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियांच्या आघाडीच्या फलंदाजांनी पुन्हा निराश केले. त्याचवेळी विराट कोहलीने झुंजार शतक ठोकल्याने वेलिंग्टन कसोटी अनिर्णित राहिली.

Leave a Comment