नवी दिल्ली – संसदेत सादर करण्यात आलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात वाहनांवरील उत्पादन शुल्क कमी करण्यात आल्याने टाटा मोटर्स तसेच जनरल मोटर्स इंडिया यांनी त्यांच्या सर्व श्रेणीतील वाहनांच्या किमती कमी करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे.

टाटा मोटर्सचे प्रवक्ते या संदर्भात म्हणाले की वाहनांवरील उत्पादन शुल्क कमी केल्याचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही आमच्या प्रवासी तसेच व्यावसायिक श्रेणीतील सर्व वाहनांच्या किंमती कमी करणार आहोत. किमती किती कमी करता येतील याचा अंदाज घेतला जात असून लवकरच नवीन किमती जाहीर केल्या जातील.
जनरल मोटर्सचे अध्यक्ष पी.बालेंद्रन यांनीही कंपनी वाहनांच्या किमती कमी करण्याचा विचार करत असल्याचे सागितले. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात लहान कार, स्कूटर, मोटर सायकल व य्यावसायिक वाहनांवरील उत्पादन शुल्क १२ टक्क्यावरून ८ टक्क्यांवर आणले गेले आहे. एसयूव्ही वरील उत्पादन शुल्क ३० वरून २४, मोठ्या कारसाठी २७ वरून २४, मध्यम आकाराच्या कारसाठी २४ वरून २० टक्के असे केले गेले आहे. हे शुल्क २० जून २०१४ पर्यंतच लागू राहणार आहे.