
ठाणे- कळवा-खारीगाव येथील मफतलाल कंपनीच्या मोकळ्या भूखंडावर असलेल्या शांतीनगर झोपडपट्टीला सोमवारी मध्यरात्री अडीजच्या सुमारास अचानक आग लागून २५ झोपड्या खाक झाल्या. या आगीत सुलेमान शेख (३५) याचा होरपळून मृत्यू झाला. मफतलाल कंपनी अनेक वर्षापासून बंद असून तेथे अनेक झोपडयांचे रान उभे राहिले आहे. शांतीनगर झोपडपट्टीतील रहिवासी सोमवारी साखरझोपेत असताना अचानक आग लागली. तिने रौद्ररूप धारण केले. या आगीत २५ झोपड्या जळून खाक झाल्या. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व आपत्कालीन विभागाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग आणली. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
