इटलीच्या पंतप्रधान पदासाठी माटेओ रेन्झी

इटलीच्या फ्लॉरेन्स शहराचे महापौर मरिओ रेन्झी यांना इटलीचे पंतप्रधान म्हणून नामांकन दिले असून ते सर्वात कमी वयाचे पंतप्रधान असतील. ३९ वर्षीय माटेओ यांना पार्लमेंट अथवा राष्ट्रीय राजकारणाचा कोणताही पुर्वानुभव नाही मात्र त्यामुळेच ते कधीच चांगले काम करू शकतील असे जाणकारांचे मत आहे.

डाव्या डेमोक्रॅटीक पक्षाचे ते सदस्य आहेत. सत्तेवर येताक्षणीच त्यांनी जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या युरोझोनमध्ये आर्थिक सुधारणा घडवून आणण्याची घोषणा केली आहे तसेच इटलीतील बेरोजगारी कमी करण्यासाठी तसेच शिक्षण व कर प्रणालीही आमुलाग्र बदलली जाईल असे स्पष्ट केले आहे. सध्याच्या दयनीय अर्थव्यवस्थेतून इटलीला बाहेर काढण्यासाठी सर्व ते प्रयत्न करण्याचा मनसुबा त्यांनी व्यक्त केला आहे.

माटेओ यांना बहुमत नाही त्यामुळे सरकार स्थिर बनविण्यासाठी को अॅलिशन असणे गरजेचे बनले आहे. त्यासाठी उद्यापासूनच बोलणी सुरू केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ही बोलणी यशस्वी झाली तर सरकार २०१८ सालापर्यंत नक्कीच स्थिर राहणार आहे.