रेडयाचे वीर्य विकून ४० लाखांची कमाई

मोहाली – शेतकरी साधारणपणे कृषी उत्पादनांतून आपली कमाई करतात, जोडीला दूध, कुकुटपालन असे जोडधंदे करतात असा आपला समज असेल तर तो आता बदलायला हवा. कारण महाभारताचे युद्ध झालेल्या कुरूक्षेत्रातील करमवीर सिंह हा शेतकरी त्याच्याकडे असलेल्या युवराज नावाच्या रेड्याचे वीर्य विकून वर्षाला ४० लाख रूपये कमावतो आहे . म्हणजे शेतकर्‍याना कमाईचा हाही एक मार्ग असू शकतो असेच त्याने दाखवून दिले आहे.

हा युवराज करमसिंग साठी रेडा नाही तर कामधेनू बनला आहे. पंजाबमधील कृषी प्रदर्शनातून त्याने हा रेडा खरेदी केला आणि तो आता साडेपाच वर्षांचा आहे. मात्र त्याच्या वीर्याला पंजाबातूनच नव्हे तर उत्तर प्रदेश, हरियाना, राजस्थान व अन्य राज्यातूनही मागणी आहे. युंवराजच्या वीर्यापासून झालेल्या म्हशी अधिक दूध देत आहेत असे कृषी खात्यातील अधिकार्‍याचे म्हणणे आहे. या म्हशींचे दूधाचे प्रमाण २२०० ते ४००० लिटर इतके आहे व त्यामुळे युवराजला मागणी मोठी आहे.