नायट्रोजन बॉम्ब करेल पृथ्वीचे उल्कांपासून संरक्षण

नायट्रोजन बॉम्ब किवा अणु बॉम्ब मानवासाठी कितीही धोकादायक आणि हानीकारक ठरू शकत असले याच हानीकारण अस्त्रांचा उपयोग पृथ्वीच्या संरक्षणासाठी करता येऊ शकेल असा दावा आयोवा स्टेट युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिक संशोधक बोंग वी आणि त्यांच्या टीमने केला आहे.

अंतराळात फिरत असलेले अनेक छोटे ग्रह, मोठ्या उल्का पृथ्वीवर येऊन पृथ्वीचा विनाश करतील अशी दाट शक्यता आहे. संशोधकांनी तयार केलेले हायपरव्हिलॉसिटी अॅस्टेरॉईड इंटरसेप्ट व्हेईकल या धोक्यावरचा चांगला पर्याय आहे. यामुळे अंतराळात असतानाच पृथ्वीच्या दिशेने येणार्‍या महाप्रचंड उल्का किवा ग्रहांच्या ठिकर्‍या उडविणे सहज शक्य होणार आहे.

रशियात गेल्यावर्षीच चेल्याबिन शहरात अशीच आकाशात स्फोट होऊन निर्माण झालेल्या प्रचंड खडकाची ६५ फूट जाडीची उल्का कोसळून १५०० लोक जखमी झाले होते. असा धोका वारंवार निर्माण होऊ शकतो व त्यामुळेच नायट्रोजन व अणुबॉम्बचा वापर  करून हे खडक नष्ट करता येतील का याचे संशोधन केले जात होते. त्याला यश मिळाले असल्याचे बोंग बी यांचे म्हणणे आहे.