नाना पाटेकर भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढणार

मुंबई – बॉलीवूड अभिनेता नाना पाटेकर भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविण्यास अखेर राजी झाला असून तो उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त यांच्या विरोधात निवडणूक लढवेल असे समजते. यापूर्वीच भाजपने नानाला या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासंबंधी विचारले होते मात्र तेव्हा त्याने नकार दिला होता. नरेंद्र मोदी आणि नानाची भेट झाल्यानंतर त्याने आपला विचार बदलला असल्याचे सांगितले जात आहे.

नानाच्या नावाची घोषणा लवकरच केली जाणार आहे. मोदींनी नानाच्या नावाचा प्रस्ताव पक्षाच्या  केंद्रीय निवडणूक समितीकडे सादर केला असल्याचेही समजते. नानाने येथून निवडणूक लढविली तर हा सामना चुरशीचा होईल. सध्या या मतदारसंघाचे नेतृत्त्व खासदार प्रिया दत्त करत आहेत. त्यापूर्वी त्यांचे वडील सुनील दत्त येथून निवडून गेले होते. या भागात अनेक बॉलीवूड कलाकार राहतात. तसेच येथे मुस्लीम, दलित आणि उत्तर भारतीयांच्या मते निर्णायक ठरू शकतात. यामुळे नाना पाटेकर यांना येथून उमेदवारी देण्याचा भाजपचा विचार आहे असे समजते.

Leave a Comment