नागपूर – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नागपूर येथील कार्यक्रमात बोलताना ममता बॅनर्जी, माणिक सरकार आणि गोव्याचे मनोहर पर्रिकर हे चारित्र्यवान मुख्यमंत्री असल्याचे सांगितले असून या यादीत केजरीवाल यांचा समावेश नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

अण्णा म्हणाले राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांसाठी त्यांनी १७ मुद्दे असलेले शपथपत्र पाठविले होते व ते भरून द्यायचे होते. ममता, मणिक सरकार आणि पर्रिकर यांनी सरकारी सवलतींचा कमीत कमी लाभ घेतला असल्याचे या शपथपत्रांवरून दिसून आले आहे मात्र केजरीवाल मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना पाठविलेले शपथपत्र त्यांनी भरूनच न दिल्याचे अण्णा म्हणाले.
राईट टू रिकॉल कायदा राजकीय भ्रष्टाचाराला आळा घालू शकेल असे सांगून या कायद्याच्या संमतीसाठी विविध राज्यात सध्या अण्णा प्रचार करत आहेत. भ्रष्टाचारी नेते निवडण्यात मतदाराही जबाबदार असतात असे सांगून ते म्हणाले की यासाठीच मतदारांत जागृती करण्याची मोहिम हाती घेतली आहे आणि स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन आम्ही करत आहोत.