सामान्यज्ञानात अमेरिकन मागेच

americans

जगभरात संशोधनासाठी नाव कमावून असलेल्या अमेरिकेतील चार पैकी १ नागरिक सर्वसामान्यज्ञानात अगदीच मागासलेल्या असल्याचे नुकत्याच केल्या गेलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. अमेरिकन राष्ट्रीय विज्ञान संस्थेतर्फे असे सर्वेक्षण दर दोन वर्षांनी केले जाते व त्याचा अहवाल संसद व राष्ट्राध्यक्षांना दिला जातो.

यावर्षी झालेल्या सर्वेक्षणात २२०० लोकांचे सर्वेक्षण केले गेले. त्यांना पदार्थविज्ञान आणि जीवशास्त्र संबंधातील १० प्रश्न विचारले गेले होते आणि नवलाची बाब म्हणजे त्यातील केवळ ६.५ टक्के लोकांनीच विचारलेल्या प्रश्नाची बरोबर उत्तरे दिली. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे उत्तर ७४ लोकांनी बरोबर दिले मात्र ४८ टक्के लोकांनी मानव हा प्राचीन प्राणी असल्याचे ज्ञान पाजळले.

या सर्वेक्षणात असेही दिसले की ९० टकके लोकांना विज्ञानाचे फायदे मान्य आहेत. कोणत्याही धोक्याच्या परिस्थितीवर विज्ञान महत्त्वपूर्ण ठरू शकते हे अनेकांनी मान्य केले मात्र विज्ञानाबाबत फारशी माहिती नसल्याचेही सांगितले.

Leave a Comment