विसरभोळ्या डॉक्टरांवर इलाज

आपल्याला प्राध्यापक विसरभोळे हे पात्र माहीतच आहे आणि विसरभोळ्या प्राध्यापकांमुळे किती गंमतीजमती होत असतात हे आपण नेहमीच ऐकत, पहात असतो परंतु प्राध्यापकांच्या इतकेच सर्जनसुध्दा विसरभोळे असतात. विसरभोळ्या प्राध्यापकांमुळे गंमती होतात. परंतु त्यांचा विसरभोळेपणा कोणाच्या प्राणावर बेतत नाही. विसरभोळ्या डॉक्टरांचे मात्र तसे नसते. त्यांचा विसरभोळेपणा एखाद्या पेशंटला ङ्गारच महागात पडण्याची शक्यता असते. कारण हे विसरभोळे डॉक्टर एखाद्या पेशंटचे ऑपरेशन करतात, त्यासाठी त्याचे पोट उघडतात आणि ऑपरेशन नंतर पोट झाकताना आत काहीतरी विसरून ठेवून जातात. ऑपरेशनची घाई असते. उघडलेल्या पोटाला लवकर झाकावे लागते. त्या गडबडीमध्ये पोटात काय राहिलेले आहे. हे त्यांच्या लक्षात येत नाही. मग पोटामध्ये एखादा चिमटा आणि कधीकधी कात्रीसुध्दा राहिलेली असते. ऑपरेशन करताना सर्जिकल कापूस ङ्गार वापरावा लागतो आणि ऑपरेशनच्या दरम्यान रक्त वाहायला लागल्यानंतर ते रक्त शोषून घेण्यासाठी कापसाचे बोळे रक्तवाहिन्यांवर ठेवले जातात. कधी कधी असे बोळे रक्ताने एवढे ओले होतात की, त्यांचा रंग बदलून रक्तासारखा होऊन जातो आणि असा बोळा पोटात राहून जातो.

असे अनेक प्रकार होतात. आत राहिलेला कापसाचा बोळा पुढे कुजतो आणि त्यामुळे रुग्णाच्या पोटाच्या पोकळीत इन्ङ्गेक्शन होते. असे इन्ङ्गेक्शन त्याच्या प्रकृतीच्या गुंतागुंतीस कारणीभूत ठरू शकते. अमेरिकेत अशा प्रकारांची पाहणी केली असता त्या देशामध्ये दरवर्षी असे चार हजार प्रकार घडतात असे आढळून आले. याबाबत आता डॉक्टर मंडळी सावध झाली आहेत. कारण डॉक्टरांच्या विसरभोळेपणाचा ङ्गटका बसलेले असे रुग्ण आता न्यायालयात धाव घ्यायला लागले आहेत आणि सारे काही पुराव्यानिशी सिध्द होत असल्यामुळे डॉक्टर मंडळी अडचणीत यायला लागली आहेत. तिचा विचार करून अमेरिकेतल्या शल्य चिकित्सकांच्या संघटनेने एक नवी मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेचे शीर्षकच ‘नो थिंग लेफ्ट बिहाइंड’ अर्थात मागे काही राहिलेले नाही यावर लक्ष द्या असे आहे.

याबाबत डॉक्टरांच्या परिषदा होत आहेत आणि त्यांना सावध केले जात आहे. यावर इलाज म्हणून एका डॉक्टरने एक अङ्गलातून युक्ती काढली आहे. नॉर्थ कॅरोलीनातील अमेरिकन कॉलेज ऑङ्ग सर्जन्स या संस्थेतील एका डॉक्टरने आर.एङ्ग.ऍश्युअर डिटेक्शन असे एक नवीन तंत्र शोधले आहे. त्यामध्ये शस्त्रक्रियेसाठी वापरले जाणार्‍या कापसाच्या बोळ्यांमध्ये एक रेडिओ ङ्ग्रिक्वेन्सी टॅग अशी छोटीसी चीप ठेवली जात आहे. ती आकाराने ङ्गार लहान आहे. मात्र ती कापसासोबत वापरल्याने कापसाच्या वापरावर काही परिणाम होणार नाही. अशा प्रकारची टॅग असलेला हा कापूस जर रुग्णाच्या पोटात चुकून राहिला तर पोट बंद करण्याच्या आधी करावयाच्या एका चाचणीमध्ये तो राहिल्याचे लक्षात येईल. म्हणजे कापूस आत असेल तर पोटाच्या जवळ आणलेले एक इलेक्ट्रॉनिक्स यंत्र आवाज करायला लागेल. त्या यंत्रातील आवाजाची यंत्रणा आणि कापसाला जोडलेला तो टॅग यांची रेडिओ ङ्ग्रिक्वेन्सी सारखी असल्यामुळे ते यंत्र आत कापूस राहिल्याचे आवाज काढून सूचित करील.

अशा रितीने वापरल्या जाणार्‍या या टॅगला खर्च येईल परंतु पोटात कापसाचे बोळे राहिल्यामुळे होणार्‍या संभाव्य नुकसानीच्या मानाने हा खर्च अगदीच किरकोळ असेल त्यामुळे या टॅगच्या वापरला गती मिळत आहे. रुग्णाच्या पोटात काहीतरी सोडून देणार्‍या डॉक्टरांना हा एक दिलासा आहे. कारण रुग्णाच्या पोटात अशा पध्दतीने काही राहू नये यासाठी वैद्यकीय शास्त्रामध्ये अनेक उपाययोजना सांगितल्या असल्या तरी ऑपरेशन हा एक असा प्रसंग असतो की, त्याप्रसंगी डॉक्टर आणि नर्स यांना त्या उपाय योजनांची प्रत्येक वेळी तंतोतंत आठवण राहतेच असे नाही. डॉक्टर आणि त्यांच्या सहकार्‍यांना ऑपरेशनच्यावेळी येणारा तणाव मोठा विचित्र असतो. त्यामुळे त्यावर असा एखादा उपाय आवश्यकच आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment