देशापेक्षा केजरीवाल यांना सत्ता प्रिय-अण्णा हजारे

नागपूर: दिल्लीचे माजी मुख्ययमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुरूवातीपासून राजकारणात उतरण्यास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कडाडून विरोध केला होता. त्याातच आता पुन्हा एकदा आम आदमी पक्षावर आणि पर्यायाने केजरीवाल यांच्या कारभारावर त्यांनी सडकून टीका केली आहे. काही दिवसातच अरविंद केजरीवाल यांना जनता आणि देशापेक्षा सत्ता प्रिय असल्याची टीका अण्णा हजारे यांनी केली.

नागपुरमध्ये आयोजित करण्याीत आलेल्या एका पत्रकार परिषदेत अण्णा हजारे बोलत होते. वास्तविक पाहता देशासाठी अतिशय महत्त्वाचे असणारे जनलोकपाल विधेयक कसे मंजूर करुन घ्यायचे याकडे अरविंद केजरीवालांनी लक्ष द्यायला हवे होते. त्यामध्ये काही कमतरता होती तर सर्वांनी एकत्रितपणे विचार करुन ते मंजूर करण्याची आवश्यकता होती. मात्र, तसे घडले नाही.

काही काळ अरविंद केजरीवाल यांनी वाट पाहण्यांस हरकत नव्हती. मात्र मला असे वाटत आहे की, काही दिवस सत्ता उपभोगल्यानंतर परत एकदा त्यांना सत्तेची लालसा निर्माण झाली आहे. त्यामुळेच त्यांना देश आणि समाजापेक्षा केजरीवालांना सत्ता महत्त्वाची वाटत असल्याचा आरोप अण्णां हजारे यांनी केला आहे.