टोकियो – जपानच्या टोकियोसह पूर्व भागात प्रचंड बर्फवृष्टी होत असून गेल्या ४५ वर्षातील ही विक्रमी वृष्टी आहे. यामुळे किमान १२ जण मृत्यूमुखी पडले आहेत तर लक्षावधी घरातील वीज गेली आहे. विमानसेवा आणि रेल्वेसेवाही विस्कळीत झाली असल्याचे सांगितले जात आहे.

टोकियोबरोबरच आद्योगिक शहर असलेले ओसाका, कोफू, यमानाशी, याकोहामा यासह अनेक शहरे बर्फवृष्टीने बाधित झाली आहेत. रस्त्यावर बर्फाचे जाड थर जमले आहेत. कोफू आणि यायानाशी शहरात ९१ सेंटीमीटर इतकी बर्फवृष्टी नोंदविली गेली असून १८९४ नंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाली आहे राजधानीचे शहर असलेल्या टोकियोत २० सेंटीमीटर बर्फवृष्टी नोंदली गेली आहे.