सोलापूर – कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पूर्वी एकत्रच होते, दोघांच्या भूमिकाही एकच आहेत. त्यामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादी लवकरच एकत्र येतील, असे संकेत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज सोलापुरात दिले. शहरात आयोजित एका कॉंग्रेसच्या कार्यक्रमात ते बोलत होते. शिंदे यांच्या एकत्रीकरणाबाबतच्या वक्तव्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादी एक होण्याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.
शिंदे म्हणाले, ‘सोलापूर शहरात कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयाची स्वतंत्र इमारत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही कार्यालयासाठी जागा घेतली आहे. त्यांचीही इमारत होईल. त्यामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येतील असं सांगता येत नाही. तसे झाल्यास एकाला अध्यक्ष व दुसऱ्याला उपाध्यक्ष करावे लागेल.’ दरम्यान, शिंदे यांना या विषयी विचारले असता देशात सध्याचे वातावरण बघता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येईल असं आपल्याला वाटत असल्याचं म्हणाले.