मॅकलमनच्या शतकामुळे न्यूझीलंडचा डावाने पराभव टाळला

वेलिंगटन- टीम इंडियाच्या गोलंदाजानी दमदार बॉलींग करताना न्यूझीलंडची अवस्था ५ बाद ९४ अशी बिकट केली होती. त्यानंतर कर्णधार ब्रॅन्डन मॅकलमने झुंजार शतक झळकवत न्यूझीलंडचा डावाने पराभव टाळला. न्यूझीलंडने तिस-या दिवसाअखेर ५ बाद २५२ धावा केल्या असून, टीम इंडियावर सहा धावांची आघाडी मिळविली आहे. मॅकलम (११४) तर, वॉटलिंग (५२) धावांवर नाबाद आहे.

रविवारी सकाळच्या सत्रात प्रभावी गोलंदाजी करुन, न्यूझीलंडच्या चार फलंदाजांना शंभरीच्या आत तंबूत धाडणारे टीम इंडियाची गोलंदाजी नंतर निष्प्रभ ठरली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी तिस-या दिवसाची सुरुवात एकदम दणक्यात केली होती. झहीरने दोन तर शमी आणि जाडेजाने प्रत्येकी एक विकेट घेत न्यूझीलंडची अवस्था ५ बाद ९४ अशी बिकट केली होती.

त्यांनतर मॅकलम आणि वॉटलिंगने संयमाने फलंदाजी करत न्यूझीलंडवरील पराभवाचे संकट टाळले. मॅक्युलमला या शतकी खेळीदरम्यान दोन जीवदाने मिळाली. मॅक्युलम आधी ९ धावांवर असताना विराटने तर नंतर ३६ धावांवर असताना ईशांतने त्याला जीवदान दिले. त्यामुळे मॅक्युलमच्या शतकी आणि वॉटलिंगच्या अर्धशतकी खेळीमुळे किवी संघाला डावाने पराभव टाळता आला. न्यूझीलंडने तिस-या दिवसाअखेर ५ बाद २५२ धावा केल्या असून, टीम इंडियावर सहा धावांची आघाडी मिळविली आहे.

सोमवारी चौथ्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांना या दोघांना लवकरात लवकर बाद करून न्यूझीलंडचा डाव झटपट गुंडाळावा लागणार आहे. नाही तर, टीम इंडियासाठी सहज वाटणारा विजय कठिण होऊ शकतो.

Leave a Comment