पुणे, – दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एआयटी) मध्ये येत्या शैक्षणिक वर्षात मेकॅनिकल इंजिनिअरींगमध्ये पदव्युत्तर शिक्षण सुरू करणार आहे. त्याचबरोबर कॉम्प्युटर इंजिनिअरींग आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन्स या विषयाचेही पदव्युत्तर अभ्यासक्रम 2015-16 पासून सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती एआयटीचे संचालक ब्रिगेडियर एस.के.लाहिरी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
लाहिरी म्हणाले, सिव्हील इंजिनिअरींगचा पदवीपूर्व कोर्स सुरू करणे हे आमचे लक्ष्य असून सन 2017-18 मध्ये पुणे विद्यापीठापासून वेगळे होवून आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजीसाठी स्वायत्तेची मागणी करणार आहे. त्यासाठी लागणारे आवश्यक ते निकष पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एआयटीला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यास अभियांत्रिकीमध्ये डॉ्नटरेट (पीएचडी) सुरू करणे सोपे जाईल.
ज्यामुळे देशात तंत्रशिक्षणात सर्वोच्च पदवी घेणे, युवकांना शक्य होईल. यासाठी परदेशात जावे लागणार नाही. यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा आम्ही उभ्या करीत आहोत. यापैकी 18 जागा लष्कराच्या सेवेतील विद्यार्थ्यांना राखीव असतील. या जागा न भरल्यास उर्वरीत जागा सामान्य प्रवर्गासाठी खुल्या असतील. पुणे विद्यापीठाचे तपासणी पथक कॉलेजला भेट देण्यासाठी येणार असून त्यांच्या शंकांचे समाधान आम्ही करू असा आम्हाला विश्वास आहे.
इनफॉरमेशन टेक्नॉलॉजीच्या डॉ. संगीता जाधव म्हणाल्या, एआयटी हे हेडकॉर्टर सदर्न कमांड समवेत तीन उपक्रम संयुक्तरित्या राबवत आहे. त्यातील एक उपक्रम म्हणजे स्टोअर मॅनेजमेंट यासाठी एक अॅनप्लिकेशन विकसित करण्यात येत आहे. 15 विद्यार्थ्यांचे तीन गट यात काम करत आहेत.नूतन इमारतीमध्ये अत्याधुनिक सुविधांनी युक्त सभागृह आणि ग्रंथालय व पदव्युत्तर विद्यार्थी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. याचे उद्घाटन सोमवारी (दि.24) होणार आहे.