राहणेच्या शतकाने टीम इंडिया मजबूत स्थितीत

वेलिंग्टन: धडाकेबाज फलंदाज अजिंक्य रहाणे याच्या शतकामुळे व शिखर धवनच्या ९८ धावा आणि कर्णधार धोनीच्या अर्धशतकाच्या जोरावर, टीम इंडियाने किवींवर २४६ धावांची आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुस-या कसोटीत टीम इंडियाचा पहिला डाव ४३८ धावांत आटोपला आहे. तिस-या दिवसाअखेर न्युझिलंडने दुस-या डावात एक गडी बाद २४ धावा केल्या आहेत.

सामन्याच्या दुस-या दिवशी अजिंक्य रहाणेने १४९ चेंडूत कारकिर्दीतील पहिल शतक झळकावले. कोरी अँडरसनला चौकार ठोकून रहाणेने अनोखे शतक साजरे केले. त्यामुळे भारताला मोठी आघाडी घेता आली. शतकानंतर आक्रमक झालेल्या रहाणेला टीम साऊथीने ट्रेन्ट बाऊल्टकरवी झेलबाद केले. बाऊल्टने रहाणेचा सुंदर झेल टिपला. रहाणेने १५८ चेंडूत ११८ धावा करून माघारी परतला. रहाणेला कर्णधार धोनीने चांगली साथ दिली. धोनीनेही अर्धशतक झळकावून रहाणेच्या साथीने ८० धावांची भागीदारी रचली. मात्र ६८ धावा झाल्या असताना धोनी माघारी परतला.

दुस-या दिवशीच्या सुरुवातीला टीम इंडियाला दमदार सुरुवात करुन देणा-या शिखर धवनचे शतक अवघ्या दोन धावांनी हुकले. धवनने १२७ चेंडूंत ९८ धावांची खेळी केली. मात्र रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला. जिमी निशामच्या गोलंदाजीवर रोहित भोपळाही न फोडता माघारी परतला. तर विराट कोहली ३८ धावांवर बाद झाला. सामन्याचे अजून तीन दिवस शिल्लक आहेत. या सामन्यात टीम इंडियाने आघाडी घेत मजबूत पकड निर्माण केली आहे.

Leave a Comment