
सुरबाया – इंडोनेशियामध्ये माऊंट केलुड या जागृत ज्वालामुखी कुंडामधून सतत राख बाहेर पडत असल्यामुळे येथील तीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उड्डाणासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ज्वालामुखी कुंडामधून राख बाहेर पडत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या कुंडामधील स्फोटाचे आवाज देशातील दुसरे सर्वांत मोठे शहर असलेल्या सुराबायापर्यंत ऐकु आले. माऊंट केलुडपासून हे अंतर तब्बल 130 किमी इतके आहे.
