इशांत शर्माने न्युझिलंडचा डाव गुंडाळला

वेलिंग्टन– न्यूझीलंड विरूध्दच्या दुस-या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या इशांत शर्मा व मोहंमद शामीच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडला १९२ धावांत गुंडाळले. पहिल्या दिवसाच्या खेळावर टीम इंडियाने वर्चस्व गाजवले. न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील १९२ धावांचा पाठलाग करताना दिवसाअखेर टीम इंडियाच्या दोनबाद १०० धावा झाल्या होत्या. शिखर धवनने शानदार अर्धशतक झळकवले असून, तो (७१) धावांवर नाबाद आहे. नाईट वॉचमन म्हणून आलेला इंशात शर्मा (३) त्याला साथ देत आहे.

पहिल्या डावात फलंदाजी करणा-या न्युझिलंड संघाचे इशांतने सहा तर, शामीने चार गडी बाद करीत कंबरडे मोडले. न्यूझीलंडकडून विल्यिमसनने सर्वाधिक (४७) धावा केल्या. अन्य फलंदाज आपली छाप पाडू शकले नाहीत. इशांत शर्माने भेदक गोलंदाजी करत न्यूझीलंडचा निम्मा संघ गारद केला. त्याला मोहम्मद शामीने चांगली साथ दिली. दोघांनी मिळून न्यूझीलंडच्या सर्व फलंदाजांना बाद केले.

पहिल्या कसोटी सामन्याच्या दुस-या डावातही भारताच्या वेगवान गोलंदाजांनी न्यूझीलंडचा दुसरा डाव १०५ धावात गुंडाळला होता.फलंदाजी करताना टीम इंडियाची सुरूवात निराशाजनक झाली. मुरली विजय दोन धावा काडून बाद झाला. त्यानंतर धवन आणि पुजाराने दमदार फलंदाजी करताना ८७ धांवाची भागीदार केली. पुजारा १९ धावा काढून बाद झाला. दिवसाअखेर टीम इंडियाच्या दोनबाद १०० धावा झाल्या होत्याल. शिखर धवन (७१) धावांवर नाबाद आहे. नाईट वॉचमन म्हणून आलेला इंशात शर्मा (३) त्याला साथ देत आहे.टीम इंडिया अजून ९२ धावांनी पिछाडीवर आहे. उद्या फलंदाजांनी चोख कामगिरी बजावली तर, भारताला कसोटीवर पकड मिळवण्याची संधी आहे.

Leave a Comment