नोकियाचा ल्युमिया आयकॉन अमेरिकेत सादर

नोकियाने ल्युमिया आयकॉन हा नवा विडोज स्मार्टफोन सादर केला असून व्हेरीझॉन आणि नोकियाने मिळून हा फोन १२ फेब्रुवारीला अमेरिकेत बाजारात आणला आहे. लवकरच हा फोन भारतीय बाजारातही उपलब्ध केला जाईल असे समजते. २० मेगापिक्सलचा कॅमेरा हे या फोनचे खास वैशिष्ठ आहे.

विंडोज ८ वर चालणार्‍या या फोनला ५ इंची स्क्रीन, ३२ जीबीची मेमरी, ७ जीबी फ्री स्टोअरेज दिले गेले असून त्यासोबत मायक्रोसॉफ्टचे स्कायड्राईव्हही दिले गेले आहे. २० फेब्रुवारीपासून या फोनची विक्री अमेरिकेत सुरू होणार आहे. फोनची किमत आहे २०० डॉलर्स म्हणजे साधारण १२४५२ रूपये. अॅपल फोन प्रमाणेच हा फोन दोन वर्षाच्या कॉन्टॅक्टवर युजरला मिळू शकणार आहे. महागडे फोन या प्रकारे कॉन्टॅक्टवर दिले जातात. या फोनसोबत अनेक अॅक्सेसरीज आणि वायरलेस चार्जर युजरला गिफट म्हणून दिला जाणार आहे.

Leave a Comment