आश्वासनांची पूर्तता होईपर्यंत टोल भरु नका – राज

मुंबई – मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होत नाही तो पर्यंत टोल भरणार नाही आणि जनतेनेही टोलभरू नये असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी सांगितले. टोलच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांबरोबर काय चर्चा झाली, कोणती आश्वासने मिळाली याची त्यांनी पत्रकारपरिषद घेऊन माहिती दिली. महाराष्ट्रातील टोल वसुलीतील अनियमितता पुराव्यांसह मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याचे राज यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्याकडे असणा-य़ा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभारावरही जोरदार टिका केली. कर्नाटकात दहा कोटींपेक्षा कमी खर्चांच्या रस्ते प्रकल्पांवर टोल वसूल केला जात नाही मग महाराष्ट्रात का टोल वसूल केला जातो असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुदत संपलेल्या टोल नाक्यांवर कंत्राटदार टोल वसूल करत असतली तर त्याला मनसे स्टाईल खळ्ळ खटॅकने उत्तर देऊ असे त्यांनी सांगितले.