स्पॉट फिक्सिंगप्रकरणी श्रीसंतने घेतली तीन खेळाडूंची नावे

चंदिगड- स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अडकलेला जलदगती गोलंदाज एस. श्रीसंतने चौकशी दरम्यान तीन भारतीय खेळाडूची नावे घेतल्यालचे पुढे आले आहे. गेल्यास वर्षी एप्रिल महिन्यात स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दोषी आढळल्याेने एस. श्रीसंतला अटक केली होती. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी चौकशी केली असता त्याने आणखी तीन खेळाडूंचे नाव घेतले होते, असा खुलासा या प्रकरणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मुद्गल समितीच्या चौकशी अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे आता हे तीन खेळाडू कोण याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

नुकताच या समितीने सर्वोच्च न्यायालयाकडे अहवाल सोपविला आहे. श्रीशांतने या तीन खेळाडूंची नावे उघड केली होती; परंतु दिल्ली पोलिसांनी त्यापैकी फक्त एकालाच समन्स दिला. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. ते तीन नेमके कोण? याचा तपशील मात्र अहवालात दिला नसून त्यांचा उल्लेख ‘भारतीय क्रिकेटर’ असा केला आहे. मॅच फिक्सिंगप्रकरणी दाऊदचे निकटवर्तीय रमेश व्यास आणि चंद्रेश यांच्या फोन कॉलवरून काही स्टार खेळाडूंची बातचीत रेकॉर्ड करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांच्या मते आयपीएलच्या एका सामन्यावर सुमारे १५० कोटींचा सट्टा लावला जातो.
समितीने मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीवरही काही प्रश्न उपस्थित केले आहेत. समितीच्या मते, पाकिस्तानी पंच असद रऊफसुद्धा या प्रकरणात सामील असल्याबाबतची माहिती मुंबई पोलिसांना १२ मे २०१३ रोजी होती. तरीसुद्धा त्यांनी रऊफची कोणतीही चौकशी न करता त्याला सहजरीत्या देशाबाहेर जाऊ दिले.

Leave a Comment