लष्करी विमान कोसळून १०३ जणांचा मृत्यू

कॉन्स्टाटाईन – अल्जेरियन लष्कराचे सी-१३० हर्क्युलस वाहतूक विमान मंगळवारी अ‍ॅइन केरचा जवळच्या पर्वतरांगांमध्ये कोसळले. या दुर्घटनेत १०३ जणांचा मृत्यू झाला आहे. सी-१३० हर्क्युलस हे अमेरिकन बनावटीचे विमान होते. तामानरासेट वरुन हे विमान कॉन्स्टाटाईन येथे निघाले असताना हा अपघात झाला. या विमानामध्ये ७४ प्रवाशी आणि लष्करी जवान होते.

अ‍ॅइन केरचा जवळच्या पर्वतरांगांमध्ये गेल्यानंतर या विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाक्षी संर्पक तुटला आणि विमान रडारवर दिसणे बंद झाले. या विमानाच्या शोधासाठी पाठवलेल्या हॅलिकॉप्टर्सना पर्वतरांगांमध्ये विमानाचे अवशेष सापडले. खराब हवामानामुळे हे विमान कोसळल्याचा अंदाज लष्कराने व्यक्त केला आहे. या भीषण अपघातात एक जवान बचावला. त्याच्या डोक्याला मार लागला असून, त्याला उपचारासाठी लष्करी रुग्णालयात दाखल केले आहे. लष्करी वाहतूकीसाठी अल्जेरियाने हे विमान अमेरिकेकडून विकत घेतले होते. दुर्घटनाग्रस्त विमान २४ वर्ष जुने होते अशी माहिती या विमानाची निर्मिती करणा-या लॉकहीड मार्टीन कंपनीने दिली.

Leave a Comment