मुंबईला मिळणार लवकरच पोलिस आयुक्त

मुंबई: काही दिवसापूर्वीच सत्यपाल सिंह यांनी राजीनामा दिल्याने मुंबई पोलिस आयुक्तपद रिक्त आहे. या ठिकाणी नवीन अधिका-याच्या व नेमणूकीची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या संदर्भातील घोषणा लवकरच करण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात लवकरच मुंबईला पोलिस आयुक्त मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पोलिस आयुक्त पदासाठी राकेश मारिया, विजय कांबळे आणि जावेद अहमद या अधिका-याची नावे चर्चेत आहेत. आगामी काळात लोकसभा व त्याा पाठोपाठ विधानसभेच्याल निवडणूका होणार असल्याआने आपल्याच मर्जीतील अधिका-याला आयुक्तपदी बसवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये गेल्या. काही दिवसांपासून स्पर्धा सुरु आहे. त्यामुळेच गेल्या १३ दिवसांपासून मुंबईचे पोलिस आयुक्तपद रिकामे आहे.

सध्या महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख असलेले राकेश मारिया तर विजय कांबळे हे वाहतूक विभागाचे पोलिस महासंचालक आहेत. तर जावेद अहमद यांच्याकडे अतिरिक्त पोलिस महासंचालकपदाची जबाबदारी आहे. सत्यपाल सिंह यांनी अचानक राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या पोलिस आयुक्तांना मोठे महत्व असणार आहे

Leave a Comment