आयपीएल सात, युवराज १४ कोटी, दिनेश कार्तिक १२.५ कोटींना

बेंगळुरु – क्रिकेट पेक्षा सट्टेबाजी, सामना निश्चितीच्या आरोपांमुळे अधिक चर्चेत राहिलेल्या इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) सातव्या मोसमासाठी क्रिकेटपटूंच्या लिलावाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत पाचशेहून अधिक खेळाडूंचा लिलाव झाला आहे. नुकताच टीम इंडियामध्ये पुनरागमन करणारा अष्टपैलू युवराज सिंगला बुधवारच्या लिलावात सर्वाधिक भाव मिळाला. विजय मल्ल्यांच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने तब्बल चौदा कोटी रुपये मोजत युवराजला विकत घेतले.

त्याखालोखाल मुंबई इंडियन्सने १२.५ कोटी रुपये मोजत दिनेश कार्तिकला विकत घेतले. गेल्या मोसमात दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये धमाकेदार फलंदाजी करत भारतीय संघात स्थान मिळवले होते. रणजी स्पर्धेतही अपयशी ठरलेल्या दिल्लीकर विरेंद्र सेहवागला किंग्स इलेव्हन पंजाबने ३.२ कोटी रुपयांना विकत घेतले. आयपीएलचे आठही संघ मालक (फ्रेंचायजी) प्रमुख खेळाडूंना संघात कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. संघाला सर्व आघाडयांवर समतोल ठेवण्याच्या रणनिती अंतर्गत फ्रेंचायची लिलावात उतरले आहेत.

पुणे वॉरियर्स संघ आयपीएलमधुन बाद झाल्यामुळे या मोसमात फक्त आठच संघ असतील. प्रथमच या लिलावात जोकर्स कार्डचा उपयोग होणार आहे. लिलाव झालेले खेळाडू – युवराज सिंग – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू १४ कोटी, दिनेश कार्तिक – दिल्ली डेअरडेव्हिल्स १२.५ कोटी, केव्हिन पीटरसन – दिल्ली डेअरडेव्हिल्स ९ कोटी, मिचेल जॉन्सन – किंग्ज इलेव्हन पंजाब ६.५ कोटी, जॅक कॅलिस – कोलकाता नाइट रायडर्स ५.५ कोटी, डेव्हीड वॉर्नर – सनरायजर्स हैदराबाद ५.५ कोटी, मुरली विजय – दिल्ली डेअरडेविल्स ५ कोटी, रॉबिन उथप्पा- कोलकाता नाइट रायडर्स ५ कोटी, फाफ ड्युप्लेसिस – चेन्नई सुपर किंग्ज ४.७५ कोटी, ड्वेन स्मिथ – चेन्नई सुपर किंग्ज ४.५० कोटी, ब्रँडन मॅक्कलम – चेन्नई सुपर किंग्ज ३.२५ कोटी, वीरेंद्र सेहवाग – किंग्ज इलेव्हन पंजाब ३.२ कोटी, जे. पी. ड्युमिनी- दिल्ली डेअरडेव्हिल्स – २.२ कोटी, श्वान मार्श – किंग्ज इलेव्हन पंजाब – २.२० कोटी, चेतेश्वर पुजारा- किंग्ज इलेव्हन पंजाब – १.९ कोटी.

Leave a Comment