रास्तो रोकोला २७ लाख वाहनचालकांचा मनसे पाठिंबा

मुंबई – टोल विरोधातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रास्ता रोको आंदोलनाला ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस एक दिवसाचा संप पुकारुन पाठिंबा देणार आहे. मंगळवारी रात्री बारा वाजल्यापासून १२ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट संघटनेशी संबंधित एकही वाहून रस्त्यावर धावणार नाही अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष बाल मनकि सिंह यांनी दिली.

या काळात महाराष्ट्रात जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणारी तब्बल २७ लाख वाहन रस्त्यावर धावणार नाहीत. आधीच पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढलेल्या आहेत. त्यात जागोजागी असणा-या टोल नाक्यांमुळे वाहतूक खर्च वाढतो परिणामी वाहतूकदारांना नुकसान सोसावे लागते त्यामुळे ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने राज ठाकरेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मनसेतर्फे संपूर्ण राज्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.