राज ठाकरे यांना अटक

मुंबई- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पोलिसांनी चेंबुरमध्ये अटक केली.पोलिसांनी बजावलेल्या नोटीशीचं उल्लंघन केल्यानं पोलिसांनी राज यांना अटक केली असल्यालचे समजते. राज ठाकरे यांना आरसीएफ पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे; त्याकठिकाणहून कोठे नेण्याेत येणार हे समजू शकले नाही. सकाळी ११ वाजता राज ठाकरेंचा ताफा वाशीच्या दिशेनं रवाना झाल्यानंतर पोलिसांनी हा ताफा चेंबुरमध्ये अडवला. यावेळी मनसे नेते आणि पोलिसांमध्ये बातचित झाली.

मनसे आंदोलन रोखण्यासाठी नाशिकात शीघ्र कृती दल तैनात कण्यात आली आले आहे. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांची धरपकड होत असल्याने आंदोलन अधिक तीव्र होत आहे. कायदा मोडणा-यांवर कारवाईचा करण्याचा इशारा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रास्ता रोकोचा पहिला दणका मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ला बसलाय. लोणावळा जवळ खंडाळा-बोर घाटात आज सकाळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या गाड्यांची हवा सोडली. मुंबईहून पुण्याला जाणा-या लेनवर हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे वाहतूक तासभर ठप्प झाली होती. तर इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर तीन हात नाक्याजवळ अज्ञात व्यक्तींनी टायर जाळलेत.

दरम्यालन, राज ठाकरे यांची गाडी सायन येथे पोलिसांनी रोखल्याने पोलिसांशी चर्चा केली. नितीन सरदेसाई, बाळा नादगावकर यांनी चर्चा केली. त्याोनंतर पोलिसानी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक केली.

Leave a Comment