इराणी चषकात कर्नाटक विजयाच्या मार्गावर

बंगळुरू- इराणी चषक स्पर्धेत सलग पाच वेळच्या चॅम्पियन असलेल्या कर्नाटकने शेष भारताविरुद्धच्या सामन्याीत धावाचा डोगर रचताना निर्णायक आघाडी घेतली आहे. कर्नाटकने पहिल्या डावात ६०६ धावांचा विशाल डोंगर रचला. यजमानांकडून स्टुअर्ट बिन्नी (११२) आणि चिदंबरम गौतम (१२२) यांनी घरच्या मैदानावर शानदार शतकी खेळी केली. कर्नाटकने पहिल्या डावात ४०५ धावांची आघाडी घेताना दिवसअखेर पाहुण्या शेष भारताला अडचणीत आणले. या शेष भारताने दिवसअखेर निराशाजनक कामगिरी करताना तीन गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या ११४ धावा काढल्या.

पाहुण्या संघाला पराभवाचे सावट दूर करण्यासाठी २९१ धावांची आवश्यकता आहे. त्याच्याकडे अद्याप सात विकेट शिल्लक आहेत. शेष भारताकडून दुस-या डावात केदार जाधवने ४४ धावा काढल्या. सलामीवीर जीवनज्योत सिंग (७) आणि गौतम गंभीर (९) स्वस्तात बाद झाले. शेष भारताने अवघ्या २० धावांसाठी आपले दिग्गज दोन गडी गमावले. मात्र, केदार जाधव आणि बाबा अपराजित (नाबाद ४२) यांनी संघाचा डाव सावरला.

तिस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा दिनेश कार्तिक ९ धावांवर खेळत आहे. पहिल्या डावात सहा विकेट घेणार्या कर्णधार विनयने दुसर्याश डावात २७ धावा देत दोन गडी बाद केले. संक्षिप्त धावफलक : शेष भारत :पहिला डाव-२०१, दुसरा डाव-४ बाद ११४ (३८ षटक), कर्नाटक: पहिला डाव -सर्वबाद ६०६ धावा

Leave a Comment