आयपीएल लिलावात युवराजला १४ कोटींची बोली

बंगलोर – येथे आज सुरू झालेल्या आयपीएल लिलावात भारताचा खेळाडू युवराज सिंग याला १४ कोटी रूपयांची सर्वाधिक बोली मिळाली असून बंगलोरच्या रॉयल चॅलेंजर्सनी त्यांची खरेदी केली आहे. विरेंद्र सेहवागला पंजाब इलेव्हन संघाने ३ कोटी २० लाख रूपयांत खरेदी केले आहे. यंदा दिल्ली डेअरडेव्हील्सने सेहवागला आपल्या संघासाठी घेतलेले नाही.

दिल्ली डेअरडेव्हील्सने केव्हीन पीटरसनसाठी ९ कोटी रूपये मोजले आहेत आणि त्यासाठी आरटीएम ऑप्शनचा वापर केला आहे तसेच मुरली विजयसाठी त्यांनी ५ कोटी रूपये मोजले आहेत. सनरायझर्स हैद्राबादने डेव्हीड वॉर्नरसाठी ५.५ कोटींची बोली लावली आहे तसेच ऑस्टेलियाच्या मिचेल जॉन्सन साठी पंजाब इलेव्हनने ६.५ कोटींची बोली लावली आहे. श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेला पहिल्या फेरीत तरी कोणत्याच संघाने विकत घेतलेले नाही.

Leave a Comment