चालू वर्षात तापमान वाढणार – अल निनोचा प्रभाव

नुकतेच सुरू झालेले २०१४चे वर्ष सर्वाधिक गरम वर्ष राहील असे नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने नुकत्याच केलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. १९९८ साल असेच गरम वर्ष ठरले होते त्यानंतर २०१४ साल हे सर्वाधिक गरम वर्ष असेल असे संशोधकांचे म्हणणे आहे.

या संस्थेतील वैज्ञानिकांनी अल निनो या प्रवाहांचा अभ्यास केल्यानंतर हा अंदाज वर्तविला आहे. या प्रवाहामुळे पॅसिफिक महासागराच्या पातळीत वाढ होते आणि पाण्याचे तापमान वाढते. भारतातील मान्सूनचा अंदाज वर्तवितानाही अल निनो आणि एल निनो या प्रवाहांचा विचार केला जातो. यंदाच्या संशोधनात अल निनो प्रभाव वाढला असल्याने पेरू इक्वेडोर या देशात नऊ महिने किवा त्याहून अधिक काळ पाऊस कोसळून पूर संकट येण्याचा धोका आहे तर इंडोनेशिया, ऑस्ट्रेलियात दुष्काळ पडून ठिकठिकाणी आगी लागण्याचा धोका असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

यापूर्वी असे अंदाज वर्तविताना किमान सहा महिने या प्रवाहांच्या हालचालींचा अंदाज घेतला जात असे मात्र अलिकडे वापरात आलेल्या नवीन मॉडेल्समुळे हे अंदाज अल्पकाळाच्या निरीक्षणांवरूनही वर्तविता येतात.

Leave a Comment