हालचाली कमी झाल्याने अकार्यक्षमता

मोठ्या कंपन्यांतील अधिकारी, मध्यम वर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय सुखवस्तू लोक आपली कार्यक्षमता गमवून बसायला लागले आहेत. कारण एका जागेवर बसून बैठी कामे केल्याने हे लोक सुस्तावले आहेत आणि लठ्ठ झाले आहेत. या लोकांची कार्यक्षमता वाढवली नाही तर देशातले औद्योगिक उत्पादन कमी होईल, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे. स्थिती तशी आहेच. साधारणपणे पन्नाशीपर्यंतच्या व्यक्तीने दिवसातून किमान पाऊण तास शरीराला हालचाल दिली पाहिजे किंवा नेमकेपणाने सांगायचे तर विविध ठिकाणचे चालणे धरून दिवसभरात किमान दहा हजार पावले चालले पाहिजे. शारीरिक तंदुरुस्ती टिकविण्यासाठी हे दहा पावलांचे बंधन घालण्यात आले आहे. सहा हजार पावले म्हणजे साधारण साडे सहा ते सात किलोमीटर. एवढे अंतर दररोज चालणे सर्वांना शक्य होईलच असे नाही.

मात्र सर्व प्रकारचे चालणे धरून ते दहा हजार पावले व्हावे. म्हणजे कोणी लोकलने प्रवास करत असेल तर लोकल स्टेशनमध्ये येईपासून डबा पकडेपर्यंतचे चालणे किंवा कारमध्ये प्रवास करत असला तरी कारमधून उतरून कार्यालयापर्यंत जाणे असे सगळ्या प्रकारचे चालणे धरून दहा हजार पावले व्हावीत. भारतातल्या १७ हजार लोकांची या संबंधात पाहणी करण्यात आली. तेव्हा असे लक्षात आले की, त्यातील केवळ ६० टक्के लोकच आठवड्यातून साधारण तीन दिवस एवढे चालतात. म्हणजे १० हजार पावलांचा नियम आठवड्यातून सातही दिवस पाळणारे कोणीच नाहीत. ६० टक्के लोक हा नियम पाळत आहेत, पण रोज नाही.

कार्यक्षमता टिकविण्यासाठी लोक काय काय करतात याचा शोध घेतला असता ६० टक्के लोक आठवड्यातून तीन दिवस अन्य प्रकारचा व्यायाम घेतात. ९४ टक्के लोक ङ्गळे खात नाहीत. नियमाने तर नाहीच, पण ङ्गळाची एखादी ङ्गोड अधूनमधून खाणे सुद्धा त्यांना आवडत नाही. आपली प्रकृती चांगली राहण्यासाठी ङ्गळे आवश्यक आहेत. परंतु ङ्गळांच्या बाबतीत काही अपवाद वगळता सगळेच लोक बेङ्गिकीर आहेत. हीच अनास्था भाज्यांच्या बाबतीत आहे. ८४ टक्के लोक आठवड्यातून केवळ तीन दिवस भाजी खातात. उठून अधूनमधून चालणे आणि वाहनांशिवाय काही कामे जाणीवपूर्वक करणे याबाबतीत तर अजिबात जागरूकता नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment