स्पॉट फिक्सिंगमध्ये काही खेळाडू असण्याची शक्यता

दिल्ली- गेल्या वर्षीच्या आयपीएल सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंगमध्ये गुरुनाथ मयप्पन दोषी असल्याचा रिपोर्ट मुदगल समितीने दिला आहे. त्यातच आता स्पॉट फिक्सिंगमध्ये सहा भारतीय प्लेअर्सचा सहभाग असल्याचा उल्लेखही मुदगल समितीच्या रिपोर्टमध्ये कऱण्यात आला आहे. त्याअमु‍ळे आता हे सहा नवीन खेळाडू कोण यावरुन प्रश्नय पडला आहे. रिपोर्टमध्ये फिक्सिंगमध्ये कोणकोणते खेळाडू आहेत हे अजून स्पष्ट केलेले नाही.

मुदगल समितीच्या रिपोर्टमध्ये या फिक्सिंगमध्ये कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याने गुरुनाथ मयप्पन याला पाठिशी घातल्याचही मुदगल कमिटीच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटविश्व पुन्हा एकदा हादरून गेले आहे. त्याआमुळे हे सहा खेळाडू कोण आहेत याची चर्चा सध्यास रंगली आहे.

याप्रकरणातील एका पत्रकाराकडे असलेल्या टेप्समध्ये बुकी आणि प्लेअर्समधला संवाद आहे. मात्र रिपोर्टमध्ये फिक्सिंगमध्ये कोणकोणते खेळाडू आहेत हे अजून स्पष्ट केलेले नाही. फिक्सिंगमधील एक-एक खेळाडू सध्याच्या भारतीय टीमचा सदस्य आहे. तर प्लेअर वर्ल्ड कपमध्येही खेळलेला असल्याचही रिपोर्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे हा खेळाडू कोण याची चर्चा रंगली आहे.

Leave a Comment