वॉशिंग्टन – गेल्या नऊ वर्षांपासून नरेंद्र मोदी यांना सातत्याने व्हिसा नाकारणार्या अमेरिकन सरकारने आता मोदी यांच्या बाबतीतले आपले धोरण बदलण्याचे ठरवलेले दिसत आहे. अमेरिकेच्या सरकारने भारतातले अमेरिकेचे वकील नॅन्सी पॉवेल यांना नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची अनुमती दिली आहे. त्यावरून अमेरिकेचे धोरण बदलले असल्याचे लक्षात येते.
२००२ सालच्या गुजरातेतील दंगलीमुळे नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलीन झाल्याचे कारण सांगून अमेरिकेने त्यांना व्हिसा नाकारला होता. परंतु आता मात्र नरेंद्र मोदी यांचा भारताच्या राजकारणात उदय होत असल्यामुळे त्यांच्या प्रभावाची दखल घेऊन अमेरिकेने त्यांच्याविषयीच्या आपल्या धोरणात मवाळपणा आणल्याचे दिसत आहे.
आता नॅन्सी पॉवेल १४ किंवा १५ फेब्रुवारीला मोदींची भेट घेतील असे सांगण्यात आले आहे. अमेरिकेच्या या बदललेल्या धोरणाचे जगातल्या काही देशांमधून स्वागत झाले आहे. असे स्वागत करणार्यात ब्रिटिश सरकार आघाडीवर आहे हे विशेष होय.