स्पॉटफिक्सिंग प्रकरणी मय्यपन दोषी

नवी दिल्ली- आयपीएल स्पॉटफिक्सिंग प्रकरणी गुरुनाथ मय्यपन हा दोषी असल्याचे न्यायमूर्ती मुदगल यांच्या समितीने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. मय्यपन हा चेन्नई सुपर किंग्जचा मालक असून बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई आहे.

आयपीएलच्या सामन्यांवर बेटिंग खेळणे आणि माहिती पुरवल्याप्रकरणी मय्यपनला या अहवालात दोषी ठरवले आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०१३ मध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरियाणाचे माजी मुख्य न्यायमूर्ती मुकुल मुदगल यांची समिती नियुक्त केली होती.

सोमवारी समितीने आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. या समितीने १७० पानांचा अहवाल तयार केला आहे. चौकशी दरम्यान सुमारे चार हजार पानांचे आयपीएलमधील खेळाडू, पत्रकार आणि आयपीएलशी संबंधित अधिका-यांचे जबाब नोंद केले आहेत.

या तपासात मय्यपन दोषी असल्याचे निष्पण्ण झाले. दरम्यान, संपूर्ण अहवाल वाचल्यानंतरच योग्य आदेश देण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. के. पटनायक यांच्या पीठाने सांगितले.

Leave a Comment