राजू शेट्टी यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल

कोल्हापूर: कोल्हापुरातल्या शिरोली परिसरात २०१२ मध्ये, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊसदर आंदोलनात जखमी झालेले कॉन्स्टेबल मोहन पवार यांचा मृत्यू झाला. त्याभ प्रकरणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, यांना अडकवण्याच्या हलचाली सुरू आहेत. कारण की पोलिसांकडन आता कॉन्स्टेबल मोहन पवार यांच्या् मृत्यूप्रकरणी राजू शेट्टी यांच्याविरोधात कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

शिरोली परिसरात २०१२ मध्ये, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊसदर आंदोलनात जखमी झालेले कॉन्स्टेबल मोहन पवार यांच्यावर वर्षभरापासून उपचार सुरू होते. रविवारी त्यांचे निधन झाले. याप्रकरणी राजू शेट्टींवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी काही कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेण्याेत येणार आहे. त्यांनतरच यासंदर्भातील पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

यापूर्वी राजू शेट्टी, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सावकार मादनाईक यांच्यालवर, कॉन्स्टेबल पवार यांच्याजवरील हल्ल्यासंदर्भात खुनाच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे आता पोलिसाकडून काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment