पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू

मुंबई- मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत येत्या १२ तारखेला टोलविरोधात रास्तारोको आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वाभूमीवर पोलिस दक्षता घेत आहेत. टोल नाक्याचे तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचे आगामी काळात १२ वाजू नयेत, म्हणून पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू होण्याची दाट शक्यता आहे. या बातमीला एका पोलिस अधिका-याने दुजोरा दिला आहे.

या रस्ताह रोको अंदोलनापूर्वीच पोलिसांनी दक्षता म्हणून उस्मानाबाद येथील मनसेच्या काही कार्यकर्त्यांना १२ तारखेच्या पार्श्वभूमीवर नोटीसा दिल्या आहेत. मनसेच्या यापूर्वीच्या आंदोलनात ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी आक्रमक, पण पोलिसांना डोकेदुखीची भूमिका पार पाडली आहे. अशा पक्षाच्यार कायकर्त्यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.

या कार्यकर्त्यांना दोन दिवस एकाच जागी बसवून ठेवणे पोलिसांना परवडते. दोन दिवस मनसे कार्यकर्त्यांना डांबून पोलिसांकडून शांतता ठेवण्याचा प्रयत्न होत असतो. मात्र मनसे कार्यकर्त्यांना हा अनुभव आता नवीन नाही, म्हणून पोलिसांनी घर गाठण्याआधीच, कार्यकर्त्यांची पांगापांग सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी काळात पोलिसांकडून काय कारवाई केली जात याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Comment