पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे पराभूत- धोनी

ऑकलंड- न्युुझिलंड विरूद़धचा पहिल्या सामन्याात जिंकण्याची संधी असताना ऐंशी षटकांनंतर न्यूझीलंडने दुसरा नवीन चेंडू घेतला. त्यानंतर आम्ही ठराविक अंतराने काही विकेट गमावल्या. यावेळी पंचांकडूनही चुकीचे निर्णय देण्यात आले. यामुळे पहिल्या कसोटीत पराभवाला सामोरे जावे लागले, असे मत टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्येक्तत केले.

गेल्या काही दिवसांपासून धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला परदेशात सर्वाधिक कसोटी सामन्यात पराभवांचा सामना करावा लागत आहे. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतर धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाला ११ व्यांदा निराशेचा सामना करावा लागला आहे. या सततच्या पराभवामुळे टीम इंडियाचे मनोधैर्य काहीसे खचले आहे.

यापूर्वीवी अनेकवेळा भारताला परदेशात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे भारताचा संघ काहीसा अडचणीत सापडला आहे. सौरभ गांगुली (१० पराभव), बिशनसिंग बेदी (८ पराभव), सुनील गावसकर व सचिन तेंडुलकर (प्रत्येकी ६ पराभव) यांचा क्रमांक लागतो. आता धोनीच्या नेतत्वाखालील टीम इंडियालापण पराभवाचा सामना करावा लागत आहे.

Leave a Comment