टोलमुळे पोलिसांचे सँडविच झाला- आर. आर. पाटील

कोल्हापूर: गेल्या काही दिवसांपासून टोलसंदर्भात सुरू असलेल्या आंदोलनामुळे पोलिसांची अवस्था अवघड झाली आहे. पुण्यात झालेल्या सभेत एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलवरून धुमाकूळ बुधवारी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तर, दुसरीकडे कोल्हापूरचे टोल आंदोलन आजपासून पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांचे गेल्या काही दिवसांपासून सँडविच झाला असल्याचे मत आर. आर. पाटील यांनी व्यक्त् केले आहे.

नुकत्याच झालेल्या सभेत कोल्हापूरचा टोलप्रश्न सोडवण्यासाठी आपण पुढाकार घेऊ. तसंच मनसेप्रमाणेच इतर पक्षांनी टोल भरावा असं आवाहनही राज यांनी केले आहे. दरम्यान, कोल्हापूर टोलविरोधी कृती समिती सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहे. जोपर्यंत मनपा आयआरबीला हॉटेलसाठी दिलेल्या जागेची मान्यता रद्द करत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू राहणार आहे.

एकीकडे कोल्हापुरात टोलवसुली बंद व्हावी यासाठीचं आंदोलन पेटले आहे. तर दुसरीकडे आयआरबीची टोलवसुली सुरूच आहे. याविरोधात आता मनपानं आयआरबीला ह़ॉटेलसाठी दिलेल्या जागेची मान्यता रद्द करावी, अशी मागणी घेऊन टोलविरोधी कृती समिती आंदोलन करणार आहे. यामुळेच पोलिसांचा सँडविच झाला आहे.

Leave a Comment