जपानमध्ये वादळी बर्फवृष्टी; 45 वर्षांचा रेकॉर्ड मोडला, 5 जणांचा मृत्यू, 600 जखमी

टोकियो – जपानमध्ये मोठ्याप्रमाणात बर्फवृष्टी सुरू आहे. राजधानी टोकियोमध्ये दोन फुटांपर्यंत बर्फाचे थर जमले आहेत. जपानला शनिवारी बर्फवृष्टीचा तडाखा बसला. त्यात दोन महिलांचा मृत्यू तर 90 नागरिक जखमी झाले. यातील 17 जणांची प्रकृती गंभीर आहे. राजधानी टोकियोमध्ये दुपारपर्यंत 12 सेंटिमीटर एवढी बर्फवृष्टी झाली. रात्रीपर्यंत बर्फाचे प्रमाण 20 सेंटिमीटरपर्यंत पोहोचू शकते, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

बर्फवृष्टी आणि वादळाचा इशारा देण्यात आल्यानंतर 615 विमान फेर्‍या रद्द करण्यात आल्या. हिरोशिमा आणि कागवा विमानतळ बंद करण्यात आले. बुलेट ट्रेनची सेवादेखील काही तासांसाठी रद्द करण्यात आली. बर्फवृष्टीमुळे अनेक दुर्घटना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. एका कार अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला.

Leave a Comment