कसोटी संघात समावेशाची गंभीर, हरभजनला संधी

बेंगळुरू : न्युझीलंड विरूद़धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियामध्येे पुन्हा स्थान मिळविण्यासाठी गौतम गंभीर व हरभजन सिंग या दोघांनाही आता चांगला खेळ करावा लागणार आहे. शेष भारत आणि रणजी करंडक विजेता कर्नाटक यांच्यात सुरू झालेल्या इराणी करंडक क्रिकेट लढतीला सुरुवात होत आहे. शेष भारत संघाचा कर्णधार हरभजनसिंग आणि गौतम गंभीर यांच्या दृष्टिने ही लढत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या सामन्यातील कामगिरीवर त्याचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

रविवार पासून सुरू झालेल्या या सामन्यातून भारतीय संघासाठी खेळाडूंची निवड होणार आहे. त्यामुळे निवड समितीची नजर हरभजन आणि गौतम गंभीरच्या खेळावर असेल. आर. अश्विनला परदेशात चांगली गोलंदाजी जमत नसल्याने, त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही.

न्युझीलंड दौ-यावर सध्या भारताला एका चांगल्या फिरकीपटूची गरज आहे, अशात हरभजनला भारतीय संघात परतण्याची उत्तम संधी आहे. याशिवाय शेष भारत संघात केदार जाधव आणि अंकित बावणे या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा समावेश आहे. हे दोघेही मिळालेल्या संधीचे सोने करण्यात उत्सुक आहेत. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment