महायुतीत राष्ट्रवादीला घेण्याचे संकेत

मुंबई- राज्याचा सत्यानाश करणा-या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या विरोधात आमची लढाई आगामी काळत सरुच राहणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काही पक्षाचा रालोआमध्येँ समावेश केला जाणार आहे. लोकसभा निवडणूकीनंतर बहूमतसाठी भाजपला काही जागा कमी पडतील असे वाटत आहे. त्या मुळे विस्तारासाठी जास्तीत-जास्त मित्र जोडण्याचा प्रयत्न राहील, असे सांगत भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी भविष्यात राष्ट्रवादीला सोबत घेण्याचे संकेत दिले आहेत. या त्यांच्या घोषणेमुळे भाजप व राष्ट्रवादी काग्रेंसमधील कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

काही दिवसापूर्वीच शरद पवार किंवा त्यांच्या राष्ट्रवादीची भाजपला गरज नाही, अशी जाहीर वक्तव्ये गोपीनाथ मुंडे यांनी अनेकदा केली आहे. त्या पाश्र्वभूमीवर गडकरी यांची ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. भाजपला सत्तेचे गणित जमविण्यासाठी जास्तीत-जास्त मित्र जोडून रालोआचा विस्तार करावा लागणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर त्या वेळच्या परिस्थितीवर सारे काही अवलंबून आहे, असे गडकरी म्हणाले.

सध्या तरी राष्ट्रवादीबरोबर युती करण्याचा विषय भाजपच्या अजेंडय़ावर नाही. अर्थात भविष्यातील राजकारणाची आताच उत्तरे देणे शहाणपणाचे नसते, अशी गुगली टाकायलाही ते विसरले नाहीत. एका बाजुला पवार-मुंडे असा संघर्ष सुरु असताना दुसरीकडे गडकरी-पवार एकाच व्यासपीठावर असतात हा काय प्रकार सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्त्यात संभ्रम आहे.