
मिलान- इटलीमधील मिलान शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भारतीय दाम्पत्यासोबत फ्लॅटवर राहणार्या एका इराणी विद्यार्थिनीची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या तरुणीसमोर शारीरिक संबंध प्रस्तापित करण्याबाबत प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र तिने तो फेटाळला होता. त्याचा राग आल्याचे या दाम्पत्याने तिची निर्घृण हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. एवढेच नव्हे तर, पुरावा नष्ट करण्यासाठी या तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये कोंबून व्हेनिस येथील तलाव परिसरात फेकून दिल्याचेही स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी आरोपी राजेश्वरसिंह आणि गगनदीप कौर या दोघांना अटक केली आहे. इराणी विद्यार्थिनी महताब सवोजी (29) ही मिलानमधील ‘कास्ट्यूम डिझाइनिंग’चे शिक्षण घेत होती. ती या भारतीय दाम्पत्यावर त्यांच्या फ्लॅटवर राहात होती. दरम्यान, राजेश्वर सिंह याने तिच्यासमोर ‘सेक्स’चा प्रस्ताव ठेवला होता. मात्र तिला तो मान्य नव्हता. या कारणावरून तिची हत्या झाल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. महताबचा मृतदेह गेल्या आठवड्यात विवस्त्र अवस्थेत व्हेनेटियन लीडो तलावाजवळ एका सुटकेसमध्ये आढळून आला होता. पोलिस सुत्रांनुसार, राजेश्वरसिंह आणि गगनदीप कौर या दाम्पत्याला अटक केली आहे.