न्यूझीलंडविरूध्दच्या कसोटीत टीम इंडिया अडचणीत

ऑकलंड: न्युझिलंडविरुध्द होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या‍ फलंदाजांनी वेगवान आक्रमणासमोर सपशेल लोटांगण घातले. किवींच्या ५०३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दुस-या दिवशीचा खेळ संपला तेंव्हा चार गडी बाद १३० अशी झाली होती. रोहीत शर्मा ६७ धावा तर अजिंक्य राहणे २३ धावा काढून नाबाद होते.

दुस-या दिवशी सुरूवातीला न्यूझीलंडच्या ब्रेण्डन मॅक्युलमने कर्णधाराला साजेशी द्विशतकी खेळी उभारली. मॅक्युलमच्या त्याच २२४ धावांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या डावात ५०३ धावा केल्या. मॅक्युलमने ३०७ चेंडूंमधली २२४ धावांची खेळी २९ चौकार आणि चार षटकारांनी सजवली.टीम इंडियाच्या दृष्टीने दिलासादायक बाब म्हणजे ईशांत शर्माने किवींच्या सहा फलंदाजांना वन डे सामन्यांच्या मालिकेतील अपयश धुवून काढले आहे.

टीम इंडियाची पहिल्या डावातील सुरुवात निशाजनक झाली. सलामीवीर शिखर धवन शून्यावर बाद झाला. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली हे देखील झटपट माघारी परते. पुजाराने एक धाव तर कोहलीने चार धावा केल्या. त्यामुळे भारताची अवस्था एकवेळी तीन बाद १० अशी झाली होती. त्यानंतर मुरली विजय २६ धावा काढून बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा व अंजिक्ये राहणे यांनी दमदार फलंदाजी करत शेवटपर्यंत विकेट पडू दिली नाही. दुस-या दिवशीचा खेळ संपला तेंव्हा चार गडी बाद १३० अशी झाली होती. रोहीत शर्मा ६७ धावा तर अजिंक्य राहणे २३ धावा काढून नाबाद होते.

Leave a Comment