पीटरसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

लंडन – इंग्लंडचा धडाकेबाज बॅट्समन आणि माजी कॅप्टन केविन पीटरसनने तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्या या निणर्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने तडकाफडकी पीटरसनला निवृत्त केले आहे. ऑस्ट्रेलिया दौ-यातील मानहानीकारक पराभवानंतर नव्याने संघाची बांधणी करण्याचा निर्णय इंग्लंड बोर्डाने घेतला असल्याचे समजते. आगामी काळात नवीन खेळाडूना संधी देण्यासाठीचा एक भाग म्हनुन निवृत्ती दिली जात आहे.

इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने आगामी काळात होत असलेल्याह वेस्ट इंडीज दौरा आणि पुढच्या महिन्यात बांगलादेशात होणा-या २०-२० वर्ल्ड कपसाठी पीटरसनला संघात स्थान दिलेले नाही. त्यामुळे त्याचे इंग्लंड क्रिकेट संघाशी असलेले नऊ वर्षं जुने नाते संपले आहे. ईसीबीचे अधिकारी पॉल डाउंटन यांनी पीटरसनला या निर्णयाची गेल्या आठवड्यात कल्पना दिली, तेव्हा तोही हादरलाच होता. आपल्या कारकीर्दीचा शेवट इतका चमत्कारिक होईल, असा विचार त्यानं स्वप्नातही केला नसेल. त्यामुळेच ही सक्तीची निवृत्ती स्वीकारणे त्याला जड जात आहे.

३३ वर्षीय पीटरसन जन्माने दक्षिण आफ्रिकेचा. पण इंग्लंडकडून खेळताना त्याची कारकीर्द बहरली. अर्थात मैदानाबाहेर संघ सहकारी आणि प्रशिक्षकांशी वादविवादांमुळंही तो वारंवार चर्चेत राहिला. केवळ ९ वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीतच त्या ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करावी लागली आहे.

Leave a Comment