पहिल्या कसोटीत न्युझिलंडने डाव सावरला

ऑकलंड: केन विल्यमसन आणि कर्णधार ब्रेण्डन मॅक्युलम या जोडीने चौथ्या विकेटसाठी झुंजार भागीदारी रचून ऑकलंड कसोटीत न्यूझीलंडचा पहिला डाव सावरत ४ गडी गमावून ३२९ धावा केल्या आहेत. कर्णधार ब्रेंडन मॅक्लुमने १४३ धावांची शानदार खेळी केली. कोरी अँडरसन ४२ धावांसह मॅक्लुमसोबत नाबाद राहिला.

टीम इंडियाने नाणेफेक जिंकून भारताने पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारले. कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा निर्णय योग्य ठरवत भारतीय गोलंदाजींनी चांगली सुरुवात केली. ईशांत शर्माने हॅमिश रुदरफर्ड (६ धावा) आणि रॉस टेलर (३ धावा) यांना, तर झहीर खानने पीटर फुल्टनला (१३ धावा) माघारी धाडून न्यूझीलंडला तीन बाद ३० असे संकटात टाकलं होते.

पण त्या कठीण परिस्थितीत सध्या ऐन बहरात असलेला विल्यमसन आणि कर्णधार मॅक्युलम न्यूझीलंडच्या मदतीला धावून गेले. केन विल्यसनने त्याचा शानदार फॉर्म कसोटीमध्येही कायम ठेवत कारकिर्दीतील पाचवे शतक पूर्ण केले आहे. त्याने १७२ चेंडूंचा सामना करताना १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ११३ धावा केल्या आहेत. विल्यसनला बाद करुन जहीर खानने भारताला मोठे यश मिळवून दिले आहे. जहीरच्या गोलंदाजीवर केन धोनीकडे झेल देत बाद झाला. केनने कर्णधार मॅक्लुमसोबत २२१ धावांची भागीदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा चार गडी गमावून ३२९ धावा केल्या आहेत.

Leave a Comment